24 न्यूज अपडेट

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बीड शहरातील पेट्रोल पंप चालक – मालकांची बैठक,जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सूचना

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बीड शहरातील पेट्रोल पंप चालक – मालकांची बैठक,जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सूचना

बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आज बीड शहरातील सर्व पेट्रोल पंप चालक व मालक यांची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.
बैठकीत शहरासह जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. यावेळी पेट्रोल पंप चालक-मालकांनी कंपनीमार्फत आवश्यक प्रमाणात इंधनाचा पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी इंधनटंचाई निर्माण झाली असून काही पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ येत असल्याची माहिती दिली. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी संबंधित पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बीड शहर तसेच जिल्ह्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात इंधनसाठा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक-मालकांनी उपलब्ध असलेल्या पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवावा, नागरिकांना विनाकारण गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच इंधन वितरणामध्ये पारदर्शकता राखावी, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी महोदय यांनी दिल्या.
जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *