24 न्यूज अपडेट

पापनेश्वर मंदिराजवळ तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; 112 वर फोन करून स्वतःच ठिकाण सांगितले

पापनेश्वर मंदिराजवळ तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; 112 वर फोन करून स्वतःच ठिकाण सांगितले

बीड / प्रतिनिधी :
बीड शहरातील तेलगाव नाका परिसरातील पापनेश्वर मंदिराजवळ एका ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित तरुणाने 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना आपल्या आत्महत्येच्या ठिकाणाची माहिती दिली आणि त्यानंतर काही वेळातच जीवन संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख आदम शेख मेहमूद (वय ३८ वर्षे) असे मयत तरुणाचे नाव असून तो बीड शहरातील मोहम्मदिया कॉलनी येथे राहणारा होता. पापनेश्वर मंदिराजवळील परिसरात त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनास्थळी त्याचे प्रेत गळफासाच्या अवस्थेत लटकलेले दिसून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आत्महत्येपूर्वीच पोलिसांना फोन करून ठिकाण सांगितल्यामुळे या प्रकरणाने अधिकच गूढ स्वरूप धारण केले आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट किंवा आत्महत्येमागील स्पष्ट कारण आढळून आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *