24 न्यूज अपडेट

बीड शहरात शांततेचा संदेश; रामनवमी व आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक

बीड शहरात शांततेचा संदेश; रामनवमी व आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक

बीड / प्रतिनिधी :
बीड शहर पोलीस ठाणे येथे आगामी रामनवमी मिरवणूक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सण-उत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना देत सणांच्या काळात संयम, सहकार्य आणि परस्पर सलोखा राखण्याचे आवाहन केले. सदरील बैठकीत बीड पोलीस दलातील भागवत सानप, सय्यद शहेंशाह, अभिजीत सानप, शेख शफीक, रणदिवे सह इतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शांतता समितीचे मुसा खान पठाण, डॉ.इलियास खान, शेषराव तांबे, बाळासाहेब घुमरे, दत्ता पडळकर, अंकुश चव्हाण, मंगेश लोडगे, हनुवते तसेच पत्रकार पठाण अमरजान यांची उपस्थिती होती.
बैठकीत सर्व धर्मीय सण एकोप्याने आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचेही नागरिकांना सूचना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *