24 न्यूज अपडेट

बीड जिल्ह्यातील पाच अट्टल गुंडांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी

बीड जिल्ह्यातील पाच अट्टल गुंडांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी

बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी व वाळू माफियांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकाच दिवशी पाच सराईत गुंडांवर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची धडक कारवाई करण्यात आली. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी २२ मे २०२६ रोजी आदेश पारित करून या पाचही जणांना छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.
या कारवाईत केज येथील जुबरे ऊर्फ मारी फारोकी (१० गुन्हे), पेठ बीडचा मोमीन सलीम (६ गुन्हे) आणि नवगण राजुरी येथील तुकाराम लक्ष्मण पवार (८ गुन्हे) यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले व कारागृहात रवाना केले. यातील एक आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दुसरा फरार आरोपी पोलिसांच्या मागावर आहे.
या गुन्हेगारांवर मारहाण, खंडणी, प्राणघातक शस्त्र बाळगणे आणि अवैध दारू विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून परिसरात त्यांची मोठी दहशत होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही कामगिरी बजावली. भविष्यातही वाळू तस्कर, गुटखा माफिया आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ व ‘मकोका’ अंतर्गत अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *