24 न्यूज अपडेट

स्वप्नातील अलिशान बंगला आगीत खाक; 28 दिवसांपूर्वीच झाली होती वास्तुशांती

स्वप्नातील अलिशान बंगला आगीत खाक; 28 दिवसांपूर्वीच झाली होती वास्तुशांती

गेवराई | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात महामुनी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या 28 दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात वास्तुशांती झालेला त्यांचा स्वप्नातील अलिशान बंगला भीषण आगीत पूर्णतः जळून खाक झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामुनी परिवार देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना घरामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. त्यानंतर गॅस स्फोट झाल्याने आगीने विक्राळ रूप धारण केले. काही वेळातच संपूर्ण बंगला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की घरातील साहित्य, फर्निचर व इतर मौल्यवान वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या.
घटनेची माहिती मिळताच महामुनी परिवार तातडीने घरी पोहोचला. मात्र, स्वतःच्या डोळ्यांसमोर आयुष्यभराच्या कष्टाने उभारलेला बंगला राख झालेला पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. या वेळी परिसरातील नागरिकांच्याही डोळ्यांत पाणी आले.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान झाल्याने परिवारावर संकट कोसळले आहे. कर्ज काढून उभारलेले त्यांचे स्वप्नातील घर काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने पंचनामा करून महामुनी परिवाराला तातडीची आर्थिक मदत द्यावी तसेच सामाजिक संस्था व दानशूर नागरिकांनीही मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *