24 न्यूज अपडेट

सातव्या वर्षी पहिला रोजा पूर्ण; सय्यद अर्शान अली इनामदार यांचा भव्य रोजा इफ्तार सोहळा संपन्न,

सातव्या वर्षी पहिला रोजा पूर्ण; सय्यद अर्शान अली इनामदार यांचा भव्य रोजा इफ्तार सोहळा संपन्न,

बीड / पठाण अमरजान
पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होताच मुस्लिम बांधव मोठ्या भक्तीभावाने रोजे (उपवास) पाळत आहेत. या पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणात बीड शहरातील चौस कॉलनी, बालेपीर परिसरातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व सय्यद समीर अली इनामदार यांचे पुतणे आणि सय्यद झहीर अली इनामदार यांचे चिरंजीव सय्यद अर्शान अली इनामदार यांनी अवघ्या सातव्या वर्षी आपला पहिला रोजा 20 फेब्रुवारी 2026, शुक्रवार रोजी अत्यंत श्रद्धा, संयम आणि भक्तीभावाने पूर्ण केला.

लहान वयात दाखविलेल्या या धार्मिक निष्ठेमुळे अर्शान अली यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून कुटुंबीयांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पुष्पवर्षाव करून अभिनंदन केले. या विशेष क्षणाचे औचित्य साधून अर्शान अली यांच्या पहिल्या रोजानिमित्त त्यांचे बडे पप्पा सय्यद समीर अली इनामदार व वडील सय्यद झहीर अली इनामदार यांनी बालेपीर, बीड येथील चाऊस फंक्शन हॉलमध्ये भव्य व दिव्य रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले.
या इफ्तार सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक वातावरणात कुरआन पठण, दुआ आणि सामूहिक इफ्तार यामुळे कार्यक्रमात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांनी अर्शान अली यांना आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
रमजान महिन्यातील या प्रेरणादायी प्रसंगामुळे परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *