24 न्यूज अपडेट

लोकशाही वाचवा ! आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या ! महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आवेज परवेज शेख मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल करा ! जिल्हाधिकारी कार्यालयासमोरआक्रोश आंदोलन – डॉ. गणेश ढवळ

लोकशाही वाचवा ! आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या !  महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आवेज परवेज शेख मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल करा !  जिल्हाधिकारी कार्यालयासमोरआक्रोश आंदोलन – डॉ. गणेश ढवळ

महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आवेज परशेख मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल करा !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरआक्रोश आंदोलन – डॉ. गणेश ढवळ

 

बीड / प्रतिनिधी
बीड शहरातील रस्त्यांच्या मध्यभागी उभे असलेले महावितरणचे विद्युत खांब व उघड्यावरील रोहित्रांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, तसेच महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गोरे वस्ती येथील १५ वर्षीय आवेज परवेज शेख याचा विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.
या वेळी “आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या!”, “लोकशाही वाचवा!” अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात शेख युनुस,मुबीन शेख, शेलार शिवशर्मा,माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), रामधन जमाले ( जिल्हाध्यक्ष इंटक), शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, राजेंद्र आमटे, शेतकरीपुत्र हक्क आंदोलक,किष्किंधा पांचाळ ( अध्यक्ष विश्वकल्याण महिला सेवा भावी संस्था बीड) शेख तालेब (पत्रकार सिटीझन), नितिन जायभाये ( अध्यक्ष बीड शहर बचाव विचारमंच) , प्रा . राजकुमार कदम,प्राचार्य डी.जी.तांदळे ( जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा बीड) डॉ.संजय तांदळे ( अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संघटना बीड), बाजीराव ढाकणे, शेख बशीर ( राज्याध्यक्ष म.र.जि.प.सेवा निवृत्त कर्मचारी संघटना), शेख वाजेद,शेख इमरान,शेख रिजवान,शेख सरफराज,शेख आमेर,शेख रीयाज, सय्यद नवाब,शेख तौफीक, विठ्ठल सवासे आदी सहभागी होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *