बीड / प्रतिनिधी
पोलीस ठाणे पाटोदा गुरन. 45/2026 कलम 331(2), 305 भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे पाटोदा येथील अधिकारी व अंमलदार करत असतांना दि.20.02.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारा मार्फत व तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहिती प्राप्त झाली की, इसम नामे 1) ज्योतीराम शरद भोसले वय 25 वर्षे रा. खांडवी ता. जामखेड जि. आहिल्यानगर व त्याचे दोन साथीदार नामे 2) राहुल काशिनाथ पवार वय 20 वर्षे रा.घोडेगाव ता. जामखेड जि. आहिल्यानगर 3) बनेश बाबुशा भोसले वय 20 वर्षे रा.खांडवी ता. जामखेड जि. आहिल्यानगर यानी मिळुन सदरचा गुन्हा केला असुन ते आज पाटोदा येथुन जामखेड कडे जाणार आहेत.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोउपनि खटावकर, पोह/सोमनाथ गायकवाड, पोह/ राहुल शिंदे, पोह/बाळु सानप, पोअ/अर्जुन यादव, पोअ/मनोज परझणे, पोअ/अशफाक सय्यद चापोह वडमारे व मांजरे असेंनी मिळालेल्या बातमीच्या आधारे पाटोदा येथे जावुन आरोपीची माहिती घेतली असता सदरचे आरोपी मोटर सायकल वरून साकत मार्फे जामखेड येथे गेल्याचे समजले. पथकाने त्यांच्या मोटर सायकलचा पाठलाग करून नमुद आरोपीस शिताफीने महासांगवी ता.जि.बीड गावचे शिवारात ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातुन गुन्हा करण्यासाठी वापरात आणलेली मोटर सायकल जप्त करून त्यांना रिपोर्टसह पोस्टे पाटोदा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थागुशा बीड व पोस्टे पाटोदा हे करीत असुन आरोपीकडुन चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी दोन लाख रूपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडुन आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नविनत काँवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक बीड श्री. सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक स्थागुशा बीड श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि खटावकर, पोह/सोमनाथ गायकवाड, पोह/बाळु सानप, पोह/ राहुल शिंदे, पोअ/अर्जुन यादव, पोअ/मनोज परझणे, पोअ/अशफाक सय्यद, चापोह वडमारे व मांजरे असेंनी मिळुन केली आहे.


