24 न्यूज अपडेट

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : चांदणेवस्ती पेठ, बीड येथे छापा टाकून 3,59,388 रुपयांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : चांदणेवस्ती पेठ, बीड येथे छापा टाकून 3,59,388 रुपयांचा गुटखा जप्त

बीड प्रतिनिधी :-
मा. पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने चांदणेवस्ती पेठ, बीड येथे धडक कारवाई करत तब्बल 3,59,388 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फेरोज दस्तगीर तांबोळी (रा. चांदणेवस्ती, बीड) हा आपल्या घरालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये विविध कंपन्यांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी साठवून ठेवत आहे.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशाने पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/ राहुल शिंदे, पोह/ युनुस बागवान, पोह/ गोविंद राख, मपोह/अश्फाक सय्यद, पोअ / स्वाती मुंडे, पोअ/ मनोज परजणे तसेच चालक पोह/ नितीन वडमारे (सर्व नेमणूक स्था.गु.शा. बीड) यांनी संयुक्तपणे कारवाई केली.                                                                             आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 08.45 वाजता चांदणेवस्ती पेठ येथील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. यावेळी सदर ठिकाणी उपस्थित असलेला फेरोज दस्तगीर तांबोळी हा पोलीस पथक पाहताच घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरालगतच्या पत्र्याच्या शेड व घराची तपासणी केली असता विविध कंपन्यांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सुमारे 3,59,388 रुपये किमतीचा विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला. सदरचा माल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे पेठ, बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वात पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *