24 न्यूज अपडेट

अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता घेणारे पोलीस एसीबीच्या जाळ्यात,

अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता घेणारे पोलीस एसीबीच्या जाळ्यात,

चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप पाटील व कर्मचारी विनोद सुरवसे रंगेहाथ पकडले; बीड पोलीस दलात खळबळ

बीड, दि. १० (प्रतिनिधी)
अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी दिवसाला हप्ता घेणारे चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील आणि पोलीस कर्मचारी विनोद सुरवसे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. मंगळवारी (दि.१०) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे बीड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूचे वाहन बिनदिक्कत चालू देण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दरमहा ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे ही रक्कम स्वीकारण्यासाठी पोलीस कर्मचारी विनोद सुरवसे उमापूर पोलीस चौकी येथे उपस्थित होता.
दरम्यान, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने सापळा रचला. सापळ्यानुसार ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना विनोद सुरवसेला एसीबीने रंगेहाथ पकडले. यानंतर प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली. सध्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांना साथ देणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *