24 न्यूज अपडेट

बीड जिल्ह्यामध्ये इंधन साठा पर्याप्त स्वरुपामध्ये असल्यामुळे नागरीकांनी इंधनासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करणे टाळावे.

बीड जिल्ह्यामध्ये इंधन साठा पर्याप्त स्वरुपामध्ये असल्यामुळे नागरीकांनी इंधनासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करणे टाळावे.

बीड / प्रतिनिधी
सध्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपुर्ण पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात व बीड शहरात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्वसाधारणपणे सर्वच पेट्रोल पंपावर अतिरीक्त स्वरुपामध्ये वाहनांमध्ये इंधन साठा करणेसाठी गर्दी होऊन पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी झालेली आहे.
या संदर्भात सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, बीड जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा साठा सद्यस्थितीमध्ये पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. काही पेट्रोल पंप चालकांनी त्यांना पेट्रोल व डिझेल प्राप्त होणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांना देयके उशिराने अदा केली त्यामुळे त्यांना इंधन साठा थोडा उशिराने प्राप्त झाला. सर्वच पेट्रोल पंप कंपनीच्या विक्री अधिकारी / प्रतिनीधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. बीड जिल्हयामध्ये पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा असुन पुरवठा सुरळीत चालु आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक साठा करू नये व पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी. चुकीच्या अफवा तसेच चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जिल्हा प्रशासन, तसेच ऑईल कंपन्या पेट्रोल व डिझेलचा साठा सुरळीत व कायम ठेवणेबाबत कटीबध्द आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *