24 न्यूज अपडेट

बीडमध्ये गुटखा तस्करीवर पोलिसांचा मोठा छापा; ₹1.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीडमध्ये गुटखा तस्करीवर पोलिसांचा मोठा छापा; ₹1.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड / प्रतिनिधी
बीड शहर हद्दीत बेकायदेशीररित्या गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी विशेष कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे.दि. 28 मार्च 2026 रोजी बशीरगंज चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक व्यक्ती स्कुटीद्वारे पान टपऱ्या व किराणा दुकानांना गुटखा पुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी संबंधित स्कुटीचा मागोवा घेतला असता ती बशीरगंज येथील सुंदर मेडिकल समोरील एका इमारतीजवळ थांबलेली आढळली. याठिकाणी डीबी पथकाने छापा टाकून विविध प्रकारचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला.
या कारवाईत अंदाजे ₹1,27,192/- किंमतीचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला.तसेच ₹85,000/- किंमतीची मोटारसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली.या प्रकरणी फिर्यादी रामेश्वर बाबुराव पवार (वय 35, रा. बार्शी नाका, बीड) यांच्या तक्रारीवरून आरोपी अमन माजिद मिर्झा बेग (वय 21, रा. बशीरगंज, बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात आरोपीने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा बेकायदेशीररित्या साठवून विक्री केल्याचे समोर आले आहे. आरोपीविरुद्ध BNS कलम 123, 223, 274, 275 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.जप्त गुटखा नेमका कुठून आणला याचा पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्री व साठा करण्यास बंदी घातलेली आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून योग्य बक्षीस दिले जाईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यात पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, उपनिरीक्षक महेश जाधव, हवालदार गहिनीनाथ बावनकर, गोवर्धन सोनवणे तसेच मंगेश शिंदे, राम पवार, इलियास शेख यांनी सहभाग घेतला.

📞 संपर्क
पो.नि. शीतलकुमार बल्लाळ – 7588807477
पो.उपनि. महेश जाधव – 9021216256
पो.हवालदार गहिनीनाथ बावनकर – 9623516652

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *