24 न्यूज अपडेट

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शिवणी गावात हळहळ

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शिवणी गावात हळहळ

बीड / प्रतिनिधी :
बीड तालुक्यातील शिवणी येथील तुळशीराम उर्फ मुकेश प्रभाळे (वय ३२ वर्षे) यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे मुकेश प्रभाळे हे एच.पी. गॅस एजन्सीत गॅस सिलेंडर वितरणाचे काम करत होते. त्यासोबतच त्यांनी घरगुती पिठाची गिरणी चालवत कुटुंबाला आर्थिक हातभार लावला होता.
मंगळवार दि. ३१ मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरातील वीज बोर्ड दुरुस्त करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला. त्यामुळे त्यांना जोरदार शॉक बसून ते जागीच कोसळले. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने शिवणीहून बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होते; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
मुकेश प्रभाळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा आणि मोठा भाऊ असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *