24 न्यूज अपडेट

बीड शहर रिपाइंच्या वतीने 12 एप्रिल रोजी ईद-मिलाफचा कार्यक्रम आयोजित – पप्पू कागदे

बीड शहर रिपाइंच्या वतीने 12 एप्रिल रोजी ईद-मिलाफचा कार्यक्रम आयोजित – पप्पू कागदे

बीड / प्रतिनिधी
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या पवित्र रमजान ईदचे औचित्य साधून सामाजिक एकोपा जोपासण्या साठी आणि हिंदू-मुस्लिम भाईचारा वाढविण्यासाठी बीड शहर रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत बशीर गंज चौक बीड येथे ईद-ए-मिलाफ (मिलन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रमजान ईदचे औचित्य साधून हिंदू-मुस्लिम भाईचारा वाढविण्यासाठी व सामाजिक एकोपा जोपासण्यासाठी रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी बीड शहर रिपाइंच्या वतीने बशीर गंज चौक बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या ईद मिलाफ (मिलन) च्या कार्यक्रमास हिंदू-मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे. असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राजू जोगदंड, मझरखान, किसन तांगडे, शेख रोहील (नगरसेवक), मसुद खान (नगरसेवक), रमेश गंगाधरे, सिद्धिक फारोखी, सुलतान बाबा, रफिक भाई (फिटर), सादिक पठाण, रणजित शिनगारे, मुबीन जुबेरी,शेख अजीम (मामु), फरहान बागवान आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *