24 न्यूज अपडेट

मुस्लिम आरक्षण संरक्षणासाठी बीडमध्ये 1 मेपासून आमरण उपोषण आंदोलनात मुस्लिम समाजातील विविध संघटना व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार

मुस्लिम आरक्षण संरक्षणासाठी बीडमध्ये 1 मेपासून आमरण उपोषण  आंदोलनात मुस्लिम समाजातील विविध संघटना व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार

मुस्लिम शिक्षण आरक्षण संरक्षण आंदोलनासाठी धर्मगुरुंची घेतली भेट दुवा सहकार्य करण्याचे दिले आश्वासन – ॲड प्रा इलियास इनामदार

बीड / प्रतिनिधी
अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या आरक्षण संरक्षणाच्या मागणीसाठी बीड येथे 1 मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनात मुस्लिम समाजातील विविध संघटना व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांच्या प्रतिनिधी मंडळाने प्रमुख धर्मगुरूंशी चर्चा केली असून आम्ही या आंदोलनात सोबत असून “आमची दुवाही तुमच्या सोबत आहे” अशी ग्वाही दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आयोजकांनी उपोषणामागील उद्देश स्पष्ट करत समाजातील सर्व घटकांनी एकजूट दाखवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आंदोलनाची पुढील दिशा व रूपरेषा ठरवण्यासाठी 24 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता बीड शहरातील जामा मशिदीत व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सामाजिक, राजकीय नेते, पत्रकार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *