३३ वर्षांच्या निष्कलंक सेवेला मिळाला मान; विविध महत्त्वाच्या विभागात बजावली जबाबदारी
बीड / प्रतिनिधी :
बीड पोलीस दलातील कर्तव्यदक्ष व निष्कलंक सेवेचा गौरव प्राप्त असलेले अशोक नलावडे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा येथील 24 news updates चे मुख्य संपादक मुसा खान पठाण व वृत्तसंपादक पठाण अमरजान, अरबाज खान,अबरार खान,अजमत खान यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
डोमरी (ता. पाटोदा) येथील भूमिपुत्र असलेले अशोक नलावडे यांनी बीड जिल्हा पोलीस दलात आपल्या प्रामाणिक, निस्पृह आणि कर्तव्यदक्ष सेवेद्वारे वेगळी ओळख निर्माण केली आहे. तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या व आव्हानात्मक विभागांमध्ये कार्य करत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), स्थानिक गुन्हे शाखा (LCB), पाटोदा व गेवराई पोलीस स्टेशन, महामार्ग सुरक्षा पथक, दहशतवाद विरोधी शाखा (ATS) तसेच जिल्हा विशेष शाखा (DSB) अशा विविध विभागांमध्ये त्यांनी अत्यंत जबाबदारीने कर्तव्य पार पाडले आहे.
अशोक नलावडे यांचे यश केवळ पदोन्नतीपुरते मर्यादित नसून त्यांच्या उत्कृष्ट जनसंपर्कामुळे ते सर्व समाजात लोकप्रिय आहेत. “सर्वांची कामे करणारा आणि सर्वांवर प्रेम करणारा” हा त्यांचा स्वभावच त्यांची खरी ओळख ठरली आहे. व्यस्त कामकाज असूनही त्यांनी नेहमीच सामान्य नागरिकांसाठी वेळ दिला, त्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला आहे.अशोक नलावडे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा येथील 24 news updates चे मुख्य संपादक मुसा खान पठाण व वृत्तसंपादक पठाण अमरजान,अरबाज खान,अबरार खान,अजमत खान यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


