24 न्यूज अपडेट

चकलांबा व माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस – बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

चकलांबा व माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस – बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील विविध घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचा समांतर तपास सुरू आहे. चकलांबा पोलीस ठाणे गु.र.नं. 167/2026 कलम 305, 331(4) भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल गुन्ह्यात दिलेल्या तक्रारीनुसार गेवराई रोडवरील सूरज बिअर बार अँड परमिट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी हॉटेलची खिडकी तोडून विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या व गल्ल्यातील रोख रक्कम चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू होता. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी चकलांबा रोडने गेवराईकडे येत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महार टाकळी परिसरात सापळा रचून कार्तिक विरसिंग नागपुरे (रा. मुंढवा, पुणे), आदित्य मयूर जाधव (रा. मांजरी, पुणे) व हर्षवर्धन मोहन रेड्डी (रा. केशवनगर, पुणे) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती दिली आहे. सदर आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीकरीता चकलांबा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याच कालावधीत माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. 153/2026 कलम 331(4) भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व स्थानिक तपासाच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशी व तपासादरम्यान चोरीस गेलेला सुमारे 80,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक बीड श्रीमती चेतना तिडके मॅडम, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री. समीर शेख सर तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी पो नि श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. माजलगाव ग्रामीण येथील कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश विघ्ने, पोह जोगदंड, पोह पठाण, पोह गित्ते, पोह घोडके व पोह मराडे यांनी केलेली आहे तसेच चकलांबा येथील कारवाई पोउपनि श्री श्रीराम खटावकर, पोउपनि श्री शेखर औटे, पोह राहुल शिंदे, पोह आनंद मस्के, पोअ बबन सलगर, पोअ अशफाक सय्यद, पोअ अश्विनकुमार सुरवसे, चापोअ सिद्धेश्वर मांजरे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *