बीड / प्रतिनिधी
जिल्ह्यात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने राबविलेल्या “रस्ता सुरक्षा अभियान 2026” या उपक्रमाला मोठे यश मिळाले असून, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत जिल्हा वाहतूक शाखेकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
या अभियानांतर्गत जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सानप व पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी वाहनधारकांसाठी विशेष वाहतूक नियम प्रबोधन शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, तसेच अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हे अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पोलीस हवालदार आजिनाथ मुंडे व सखाराम घोलप यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यात रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती वाढविण्यासाठी वाहतूक शाखेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे..


