24 न्यूज अपडेट

अंबाजोगाई मध्ये चारचाकी वाहनातुन विक्रीसाठी जात असलेला 13 लाखांचा गांजा पकडला स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांची संयुक्त कामगिरी

अंबाजोगाई मध्ये चारचाकी वाहनातुन विक्रीसाठी जात असलेला 13 लाखांचा गांजा पकडला स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांची संयुक्त कामगिरी

बीड / प्रतिनिधी
मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी बीड जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे धडक मोहीम सुरु केली असुन बीड जिल्हा पोलीस दलातील सर्व प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेला अंमली पदार्थ साठा, लागवड, विक्री, व वाहतुक बाबत माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेशीत केलेले आहे.
दिनांक 28/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अंबाजोगाई येथे सटवाजी नगर येथील ड्रिमसिटी येथे चारचाकी वाहनांमधुन अवैद्य रित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करीता वाहतुक होणार आहे, या मिळालेल्या माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखा येथिल पोउपनि सुतळे व अंमलदार तसेच पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त कारवाई करण्याचे नियोजन करुन अंबाजोगाई येथील सटवाजीनगर, ड्रिमसिटी मध्ये सिमेंट रोडवर एक पांढ-या रंगाची चारचाकी गाडी या ठिकाणी छापा मारला असता गाडीमध्ये दोन निळ्या रंगाचे प्लॅस्टीकच्या पोत्यामध्ये ओलसर, वाळसर व उग्रट वास येत असलेला पान, फुल, बिया, बोंड असलेल्या दाबलेला अंमली पदार्थ गांजा मिळुन आला, वजन केले असता जवळपास 28 किलो गांजा मिळुन आला. सदरील गांज्या वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी गाडी व गांज्या एकुण 13,70,860 रुपयाचा गांज्या व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असुन आरोपी प्रतीम राम तरकसे, वय 27 वर्षे.रा. आडस ता. केज जि.बीड याचे सह त्याचे साथीदार 2. प्रतिक भगवान पाटोले, 3. अजय पाटोळे, दोन्ही रा. आसरडोह ता.धारुर जि.बीड 4. अजय देवकर रा. अंदोरा ता. कळंब जि.धाराशिव यांचेवर पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांचे फिर्यादी वरुन पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर गु.र.नं. 83/2026 कलम 20, 8 (सी) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि. 1985 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर हे करीत आहे.
सदरील कामगिरी हि, श्री. नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री. ऋषिकेश शिंदे, सहा. पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, शरद जोगदंड पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकाण, सुनिल अलगट, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे, व पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथील पोलीस हवालदार वडकर, गायकवाड, तेजेस वाहुळे, पोलीस अंमलदार चादर गायकवाड, आय बाईक अंमलदार खरटमोल यांनी मिळुन केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *