24 न्यूज अपडेट

माजी लेफ्टिनेंट जनरल सैयद अता हसनैन बिहारचे नवे राज्यपाल; १४ मार्च रोजी शपथविधी संपन्

माजी लेफ्टिनेंट जनरल सैयद अता हसनैन बिहारचे नवे राज्यपाल; १४ मार्च रोजी शपथविधी संपन्

पटना / प्रतिनिधी
सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल सैयद अता हसनैन यांनी १४ मार्च २०२६ रोजी बिहारचे ४३ वे राज्यपाल म्हणून पदाची शपथ घेतली. त्यांनी माजी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची जागा घेतली असून ते २ जानेवारी २०२५ पासून या पदावर कार्यरत होते. ही नियुक्ती भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे.
पटना येथे आयोजित शपथविधी समारंभात संगम कुमार साहू पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी सैयद अता हसनैन यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. या कार्यक्रमास अनेक मान्यवर तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे बिहारच्या इतिहासात प्रथमच एखाद्या माजी सैन्य अधिकाऱ्याची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सैयद अता हसनैन हे भारतीय सैन्यातील अत्यंत प्रतिष्ठित अधिकारी राहिले असून त्यांनी विशेषतः काश्मीरसह संवेदनशील भागांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत उल्लेखनीय सेवा बजावली आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासनिक अनुभवासोबतच सुरक्षा आणि राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले नेतृत्व बिहार राज्याला लाभल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *