24 न्यूज अपडेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर बनावट पिवळे रेशनकार्ड; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर बनावट पिवळे रेशनकार्ड; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

छ. संभाजीनगर / प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस स्टेशन पोलिसांनी येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बनावट पिवळ्या रेशनकार्डवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (रा. आंबेडकरनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश अशी नावे नमूद करण्यात आली होती. संबंधित रेशनकार्ड खरे असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी त्यावर अधिकृत वाटणारे शिक्के आणि स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या होत्या.
हा प्रकार १२ मार्च रोजी सायंकाळी प्रशासनाच्या निदर्शनास आला. तपासादरम्यान रेशनकार्ड बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सिटी चौक पोलीस स्टेशन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बनावट रेशनकार्ड तयार करण्यामागील उद्देश काय आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारी योजनांचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *