24 न्यूज अपडेट

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी;शहर हाद्दीमध्ये फुलाईनगर येथे स्वीप्ट कार व त्यामध्ये विविध कंपनीचा गुटखा असा एकुण ६,६७,१८४/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी;शहर हाद्दीमध्ये फुलाईनगर येथे स्वीप्ट कार व त्यामध्ये विविध कंपनीचा गुटखा असा एकुण ६,६७,१८४/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

बीड / प्रतिनिधी
अधीक्षक साहेब, बीड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चटन करणे बाबतचे आदेश दिलेले आहेत. पोलीस निरीक्षक स्था. गु.शा.,बीड यांना आज रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन बीड शहर हद्दीतील फुलाईनगर बीड येथुन स्वीफ्ट कार क्र. MH-43/ R-5725 मध्ये बेकायदेशिररित्या विविध कंपनीचा गुटखा विक्री करण्यासाठी घेवुन जात आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/राहुल शिंदे, पोह/युनुस बागवान, मपोह/ स्वाती मुंडे, पोअं/अशपाक सय्यद, पोअं./मनोज परजणे, चालक पोह/नितीन वडमारे सर्व नेमणुक स्थागुशा बीड असेनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन आज दि.16.03.2026 रोजी 08.30 वाचे सुमारास छापा मारला असता. सदर ठिकाणी एका स्वीफ्ट कारमध्ये इसम नामे भाऊसाहेब राम पडुळे वय 34 वर्षे रा. औरंगपुर ता. जि. बीड ह.मु. स्वर्णनगरी फुलाईनगर बीड हा त्याच्या आर्थिक फायद्याकरीता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा ताब्यात बाळगुन त्याची स्वीप्ट कारमध्ये विक्री करण्यासाठी वाहतुक करीत असतांना एकुन 6,68,184/- रुपयाच्या मुद्देमालासह मिळुन आला. सदरचा गुटखा त्याने रेवन्नाथ चादर रा. भाटसांगवी ता.जि.बीड (फरार) याचे कडुन घेवुन आल्याचे चौकशीमध्ये सांगीतले असुन नमुद दोन्ही आरोपी विरूध्द पोस्टे बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सदर गुन्ह्यात आणखीन कोणी आरोपीचा सहभाग आहे काय ? याबाबत स्थानिक गुन्हे शाखा बीड व पोलीस ठाणे बीड शहर पोलीस तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/राहुल शिंदे, पोह/युनुस बागवान, मपोह/स्वाती मुंडे, पोअं/ अशपाक सय्यद, पोअं. / मनोज परजणे, चालक पोह/ नितीन वडमारे यांनी मिळुन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *