बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याने पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासून शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत त्यांना बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॉन्सन यांची खंबीर साथ लाभली आहे. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व वाळु माफीयांचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत ब-याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. त्या अनुषगाने पोनि पो.स्टे. पेठ बीड यांनी दिनांक 05/03/2026 रोजी इसम नामे शेख कलीम शेख जमाल वय 41 वर्षे रा. बारादरी मज्जिद जवळ इस्लामपुरा पेठ बीड याचे विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बोड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसमा विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर, पोस्टे बीड शहर, पोस्टे पेठ बीड शासकीय नोकरावर हल्ला करणे, धाकदपटशा करुन शिवीगाळ करणे, शासकीय नोकरावर हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला कर्तव्यापासुन परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे, रस्त्यात अडवुन दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करुन मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देणे, लोकसेवक सार्वजनिक कार्य पार असताना त्यांना अटकाव करणे, शासकीय कार्यालयातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अशा प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे.
सदर जाब देणार याचेवर बी.एन.एस.एस.2023 चे कलम 129 प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करुन देखील त्याच्या वर्तणुकीत बदल झालेला नाही. त्याने शासकीय नोकरावर हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणे व जिवे मारण्याच्या धमक्या देणे, मारहाण करणे असे गुन्हे करणे चालुच होते. त्याच्या अशा या गुन्हेगारी वृत्तीमुळे तो धोकादायक गुंड झाला असुन त्यामुळे जनतेमध्ये तसेच शासकीय नोकरामध्ये, सार्वजनिक ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण झाले असुन जनतेचे व शासकीय नोकराचे जनजिवन विस्कळीत झालेले आहे. तसेच त्याच्या कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आली होती. तो अशा स्वरुपाचे गुन्हे 2023 पासुन करीत आहे.
सदर प्रकरणात श्री. विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 22/05/2026 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी हा उदात्त दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हसुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पोनि पेठ बीड व पो.नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. सदर आदेशावरुन पो.नि. पेठ बीड यांनी सदर इसम हा मा. न्यायालयाचे न्यायालयीन कोठडीमध्ये असल्याने मा. न्यायालयाचे परवानगीने सदर इसमास दिनांक 13/06/2026 रोजी 12.32 वा. कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानवध्द करणे करीता रवाना केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री शिवाजी बंटेवाड स्थागुशा बीड, सपोउपनि अभिमन्यु औताडे, नेमणुक स्थागुशा बीड पोस्टे पेठ बीडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. मारुती खेडकर, सध्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. निलेश केळे, पोलीस उपनिरीक्षक श्री.मन्सुर शहा, पोलीस हवालदार सुभाष मोठे, पोह/नितीन राठोड, नितेश माने, पोअ, गिरी नेमणुक पोस्टे पेठ बीड यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळूचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाजकंटक यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी दिले आहेत.


