24 न्यूज अपडेट

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड येथे सह आयुक्तपदी पदोन्नती

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड येथे सह आयुक्तपदी पदोन्नती

बीड | पठाण अमरजान
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त पदावर पदोन्नतीसह बदली करण्यात आली आहे. आपल्या कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि धाडसी प्रशासकीय कार्यशैलीमुळे जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करणारे फडसे यांच्या बदलीची बातमी समोर येताच प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
बीड नगर परिषदेत कार्यरत असताना शैलेश फडसे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत शहराच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविणे, प्रशासनात पारदर्शकता राखणे आणि विकासकामांमध्ये शिस्त आणणे यामुळे त्यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये वेगळी छाप निर्माण केली होती. त्यामुळे ते केवळ प्रशासकीय अधिकारी न राहता जनतेसाठी सहज उपलब्ध असणारे आणि लोकप्रतिनिधीप्रमाणे काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे शहरातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेकांनी त्यांच्या कार्यकाळाचे कौतुक करत ही बदली बीडसाठी मोठी प्रशासकीय पोकळी निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, या बदलीमागे केवळ नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे की अन्य काही कारणे आहेत, याबाबतही विविध स्तरांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, अधिकृतरीत्या त्यांना नांदेड येथे सह आयुक्तपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेची दखल शासनाने घेतल्याचे मानले जात आहे.
नांदेड येथे नव्या जबाबदारीसाठी रवाना होत असताना शैलेश फडसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *