24 न्यूज अपडेट

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

रात्रीच्या वेळी धुळे -सोलापुर हायवे रोडवर दुचाकीस्वाराला लुटणा-या गुन्हेगारांना एलसीबीने ठोकल्या बेड्या

बीड / प्रतिनिधी
पोलीस ठाणे बीड ग्रामीण हाद्दीमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक समनापुर शिवारात धुळे ते सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 16/06/2026 रोजी रात्री 02.30 वा सुमारास फिर्यादी नामे राधेशाम नंदलाल पारीख वय 42 वर्षे रा.विप्रनगर पेठबीड हे त्यांचे मोटार सायकलवर पालीहुन बीड कडे येत असतांना 04 अनोळखी इसमांनी त्यांना आडवुन चापटाने मारहाण करुन जबरीने त्यांचे खिशातील 23000 रु नगदी काढुन घेतले होते. त्यावरुन फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे गु.र.नं. 222/2026 कलम 309 (6) भारतीय न्यास संहीता अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास मा. पोलीस निरीक्षक श्री. बंटेवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर व त्यांचे पथक करत होते. दिनांक 22/06/2026 रोजी अनेक सी.सी.टी.व्ही फुटेज पाहिल्या नंतर व तांत्रीक विश्लेषण केल्यानंतर तसेच पोलीस अंमलदार अश्पाक सय्यद यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीवरुन सदरचा गुन्हा हा आवेजखान परवेजखान रा. हिना पेट्रोल पंपाचे पाठीमागे बार्शीनाका बीड याने व त्याचे साथीदाराने केला असल्या बाबत खात्री झाल्याने सदर पथकाने आरोपी नामे आवेजखान व त्याचे इतर तीन साथीदार यांना बार्शीनाका परिसरातुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यात आरोपी नामे 1) आवेजखान परवेजखान वय 25 वर्षे रा. हिना पेट्रोल पंपाचे पाठीमागे बार्शीनाका बीड 2) अनिकेत ऊर्फ चिक्या विश्वास डोंगरे वय 23 वर्षे रा. प्रकाश अंबेडकर नगर बार्शीनाका बीड 3) अविनाश शैलेंद्र ससाणे वय 22 वर्षे रा. पंचशीलनगर बीड व 4) विवेकानंद दिलीप गलांडे वय 26 वर्षे रा. पंचशीलनगर बीड यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यातील चोरलेली रोख रक्कम 23000/-रु व गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. वरील सर्व आरोपी यांना मुद्देमालासह पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे हजर केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्री. सोनवळे पोस्टे बीड ग्रामीण हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/अशोक दुबाले, पोह/सोमनाथ गायकवाड, पोह/बाळु सानप, पोह/अर्जुन यादव, पोह/राहुल शिंदे, पोअ/2210 अशफाक सय्यद, पोअ/मनोज परजणे, पोअ/अश्वीन सुरवसे, व चापोह / नितीन वडमारे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *