बीड / प्रतिनिधी
परभणी व हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या दैदिप्यमान विजयाबद्दल महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख कमरान खान यांनी व्यक्त आहे.
मा. एकनाथ शिंदे साहेब व डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांनी सईद भैय्या खान यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेची उमेदवारी दिली. त्यांच्या नेतृत्वावर, कार्यक्षमतेवर आणि जनसंपर्कावर ठेवलेला विश्वास मतदारांनी सार्थ ठरवत ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांचा विजय आहे.
विशेष म्हणजे, मा. एकनाथ शिंदे साहेब आणि डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक समाजाला न्याय, सन्मान आणि प्रतिनिधित्व देण्याचे कार्य सातत्याने होत आहे. सईद भैय्या खान यांना दिलेली उमेदवारी ही देखील अल्पसंख्याक समाजावरील विश्वास आणि त्यांना मुख्य प्रवाहात स्थान देण्याच्या सकारात्मक भूमिकेचे प्रतीक आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अल्पसंख्याक समाजाच्या वतीने मी मा. एकनाथ शिंदे साहेब, डॉ. श्रीकांत शिंदे साहेब आणि महायुती नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. अल्पसंख्याक समाजाला न्याय देत विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याची त्यांची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
परभणी व हिंगोलीतील जनतेचे, महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बांधवांचे देखील मनःपूर्वक आभार. भविष्यातही मा. एकनाथ शिंदे साहेब, डॉ. श्रीकांत शिंदे साहेब आणि सईद भैय्या खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व महायुती जनहिताचे कार्य अधिक जोमाने करत राहील, असा विश्वास आहे.


